सोमवार, २६ मार्च, २०१२

ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता

ती आई होती म्हणूनी, घनव्याकूळ मी ही रडलो
त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता

अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता
                             - Gress 

मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०११

"स्वप्न पाहण्यासाठी एक रात्र सुध्दा जास्त असते, पण स्वप्न पुर्तिसाठी एक आयुष्य सुध्दा कमी पडते. देव देताना इतकं देतो की,कुठं ठेवावं सुचत नाही, अन घेताना एवढं घेतो की जगावं की मरावं हे सुचत नाही".

सोमवार, २३ मे, २०११

       परदेशी पाखंर

शुक्रवार, २८ जानेवारी, २०११

माझ्या ........

मुसळधार पाऊस खिडकीत उभं राहून पहा
बघ माझी आठवण येते का?

हात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी
इवलसं तळं पिऊन टाक
बघ माझी आठवण येते का?

वार्‍याने उडणारे पावसाचे थेंब चेहर्‍यावर घे
डोळे मिटून घे, तल्लीन हो
नाहिच जाणवलं काही तर बाहेर पड, समुद्रावर ये
तो उधाणलेला असेलच, पाण्यात पाय बुडवून उभी रहा
वाळू सरकेल पायाखाली, बघ माझी आठवण येते का?

मग चालू लाग, पावसाच्या अगणित सुया टोचून घे
चालत रहा पाऊस थांबेपर्यत, तो थांबणार नाहिच, शेवटी घरी ये
साडी बदलू नकोस, केस पुसू नकोस, पुन्हा त्याच खिडकीत ये
आता नवर्‍याची वाट बघ, बघ माझी आठवण येते का?

दारावर बेल वाजेल, दार उघड, नवरा असेल
त्याच्या हातातली बॅग घे, रेनकोट तो स्वतःच काढ़ेल
तो विचारेल तूला तुझ्या भिजण्याचं कारण, तू म्हणं घर गळतयं
मग चहा कर, तूही घे
तो उठून पंकज उधास लावेल, तो तू बंद कर
किशोरीचं सहेलारे लाव, बघ माझी आठवण येते का?

मग रात्र होईल तो तुला कुशीत घेईल, म्हणेल तू मला आवडतेस
पण तुही तसचं म्हणं
विजांचा कडकडात होईल, ढ़गांचा गडगडाट होईल
तो त्या कुशीवर वळेल, त्याच्या पाठमोर्‍या शरीराकडे बघ
बघ माझी आठवण येते का?

यानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पहायला विसरू नकोस
यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर
यानंतर उशीखाली सुरी घे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर
येत्या पावसाळ्यात एक दिवसतरी, बघ माझी आठवण येते का?

-किशोर कदम.

मंगळवार, १८ जानेवारी, २०११

बुधवार, २२ डिसेंबर, २०१०

सोमवार, २० डिसेंबर, २०१०


my friend SABA

तुझा वाढदिवस
तुझा वाढदिवस असावा श्रावनातल्या रेशीमधारा युगानु युगे शील घालत माळरानातून फिरनारा वारा
तुझा
वाढदिवस असावा पावसातिल इंद्रधनुष्य चमकत राहिल नेहमीच तुझं आयुष्य
तुझा
वाढदिवस असावा प्रवाहाचं नदिचं पाणी
विसरून
जातील तुझ्या दुख्खाची गाणी
आणि
तुझा वाढदिवस असावा आयुष्य बहरनारा

शुक्रवार, १७ डिसेंबर, २०१०


रानातला झारा

माझी प्रेरणा

गुरुवार, १६ डिसेंबर, २०१०

मंगळवार, १४ डिसेंबर, २०१०


ते दिवस

ते दिवस खरचं खुप छान होते
अवखळ
, खेलकर ,मजेशीर
कसे
निघून गेले कधी कळलेच नाही
मनासारखे अजुन प्रत्येकला छललेच नाही

खरी
मजा तेंव्हाच केलि विसरता येणारी
भांड
करूनही कमेकला समजुन घेणारी
कट्ट्यावर
बसण्याची आवड जरा जास्तच होती
खरं सांगू तेंव्हा आपली टीमच मस्त होती
जेवनासठी बी बसताना इतराना चुकवायची कसरत करायची
आणि
इतरांची मापं काढत दुपार निघून जायची

दोन
रुपयाच्या चहासाठी मित्राकडेच अपेक्षा करायची
प्रयाक
टिकल सुरु जाली की डेड लाइन दिवशी जमा करायची
त्यासाठी मात्र शेवटची रात्र जगवाय्ची
दुपारी
पेपर असला की सकाळी आभ्यास करायचा
आणि
हाच फॉरम्युला दरवेळी वापरायचा

दर
दिवशी आपण सागले जमायचो
सगले
प्रोग्राम क्यान्सल करुन मुद्दाम भेटायला यायचो
करियरची चिंता तेंव्हा कोणालाच नव्हती
आणि
आता देखिल तिची भिडं कोणालाच नाही

आता
मात्र भेत्न्यसती वेळ शोधावा लागतोय
आणि
त्यासाठी सुद्धा मुहूर्त लागतोय
भेटण्याची कारनसुद्धा तयार ठेवलित सगळ्यानी
आठवणींचे
थावे मानत सोडले सगळ्यानी
कोण कोठे निघून गेलं आता पत्ता ही लगत नाही
भेटू
म्हनलं तरी आता सहज कुणी भेटत नाही

संपले
ते दिवस राहिल्या फ़क्त आठवणी
तुमच्या
आहेत का माहित नाही
पण
अजुन तरी त्या माझ्या आहेत.